संजीवनी फाऊंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त चंद्रपुर शाखेच्या वतीने आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न #Chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- दिनांक १७ मे २०२२ रोजी,स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर येथे,संजीवनी फाऊंडेशन चंद्रपुर महानगर तर्फे संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा यशस्वी रितीने सम्पन्न झाली.आयोजित स्पर्धा व कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तथा उद्घाटक म्हणुन मा.गोपालजी मुंधडा (जनक,योग नृत्य परिवार) लाभले. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. प्रिती सरबेरे मॅडम लाभले.सोबतच प्रमुख उपस्थिती मा.राजेश बसवेश्वर हजारे (विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रमुख संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य), मा.एकमेव कुंदावार (महासचिव बल्लारपुर विधानसभा, युवक काँग्रेस) इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
अतिशय उत्साहपणे कार्यक्रम पार पड़ला.प्रमुख उपस्थिती तथा उद्घाटक म्हणुन लाभलेले मान्यवर मा.गोपालजी मुंधडा यांनी योग साधना सेशन घेऊन सर्व युवा वर्गाला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.सोबतच डॉ. प्रिती सरबेरे मॅडम यांनी सुद्धा छान मार्गदर्शन केले केले.उद्धघाटन कार्यक्रम नंतर लगेच वक्तुत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात अतिशय उत्कृष्ट अशे स्पर्धक यांनी सहभाग घेतला व आपले विषय मांडले.वक्तृत्व स्पर्धा करिता परिक्षक म्हणुन प्रा.डॉ.निकोड़े सर उपस्थित होते.अतिशय योग्य रितिने संपूर्ण कार्यक्रम पार पड़ला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणाली रुईकर तर आभार शितल ताजने यांनी केले.याप्रसंगी मा. इजाज जी शेख ( विस्तार समिती उपाध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य) मा.शुभम जी निंबाळकर ( विश्वस्त,नागपुर विभाग संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य) मा.आकाश जी वानखेडे (चंद्रपुर जिल्हा सचिव), महानगर अध्यक्ष अविनाश चोले,उपाध्यक्ष दर्शन मेश्राम,सचिव रुचिता टोकलवार, कोषाध्यक्ष साहिल चौधरी,संघटक ज्ञानश्री गोंनाडे,प्रसिध्दी प्रमुख अंकिता काटकर,विश्वस्त शीतल ताजने,स्वीकृत सदस्य अमर साळुंके,शालिनी निर्मलकर इत्यादी पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या संयोजन समिती मध्ये प्रणाली रुईकर,धनश्री शिंदे,जान्हवी माहुरपवार,सागर रामटेके,संतोष कुळमेथे उपस्थित होते.