Top News

आज होणाऱ्या आभासी (online) बैठकीकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष #chandrapur #gadchiroli


गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात विद्या परीषदेची तातडीची आभासी (online) सभा
गडचिरोली:- कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा संदर्भात विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक (Descriptive) पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आलेले आहे. या परीक्षा पध्दतीबाबत विविध संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेले असून महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाने परीक्षा पध्दतीबाबत घेतलेल्या निर्णयाचा अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा पध्दतीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याकरीता सभेला विद्यापरिषदेचे सदस्य व निमंत्रीत सदस्यांनी आभासी (Online) पध्दतीने उपस्थित राहणार आहेत.

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक ( Descriptive ) पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आले. मात्र विद्यार्थी संघटनेचे याचा विरोध दर्शवित कुलगुरूंना निवेदन दिले. त्यामुळे कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत परीक्षा नेमकी कशापध्दतीने घेण्यात येणार या बद्दल चर्चा होणार असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

नागपूर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाच्या (University) परीक्षा अखेर ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्वत परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, ऑफलाइन परीक्षा असताना, विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयातील होम सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी राहणार आहे.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली द्वारे गोंडवाना विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन दि 21 मे ला निदर्शने झालीत यामध्ये नागपूर विद्यापीठाने परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा नागपूर विद्यापीठाची ऑफलाईन MCQ पॅटर्न परीक्षा गोंडवाना विद्यापीठात सुद्धा राबवावी यासाठी अभाविप ने निवेदनाद्वारे मागणी केली. दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापीठाने लवकरात लवकर घेतली नाही तर अभाविप द्वारे विद्यापीठाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा अभाविपच्या कार्यकत्यांनी दिला.
ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्या; विद्यार्थ्यांचा आग्रह....

गोंडवाना विद्यापीठाने कोरोनानंतर महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, निम्म्याहून अधिक सत्रे ऑनलाइन शिकविल्यानंतर आता परीक्षा ऑफलाइन का घेतली जात आहे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. गोंडवाना विद्यापीठाने विश्लेषनात्मक (Descriptive) परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा आणि ऑफलाईन MCQ आधारित परीक्षा घ्यावी. असा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे दि. २१ मे ला परीक्षा संदर्भात एक परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते परीपत्रक फेक होते. कुणीतरी २२ एप्रिल २०२२ निघालेल्या परीपत्रकासोबत खोडसाळ पणा केला होता.... आधार न्युज नेटवर्क ने परीपत्रकाची शहानिशा केली असता त्या मध्ये महत्वाचे तीन चुका मिळाले.
१) त्यामध्ये जावक क्रमांक दिलेला नव्हता
२) दिनांक चुकिची टाकला होता.
३) डॉ. चिताडे सरांची sing तसेच साइड ला दिनांक त्यामध्ये चुका झालेल्या होत्या. त्यामुळे आधार न्युज नेटवर्क ने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परीपत्रकावर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते.
FAKE परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल अन् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात एक FAKE परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले. विद्यार्थ्यी परीपत्रक बघताचं विद्यार्थ्यांमध्ये काही क्षणा करीता आनंदाचे वातावरण पसरले. मात्र आधार न्युज नेटवर्क ने "त्या" परीपत्रकाची शहानिशा केली असता ते परीपत्रक फेक असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला नको याकरिता लगेच बातमी तयार करीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने