सुटीवर आलेल्या जवानाने वाचविला पुरात वाहून जाणाऱ्या 5 जणाचा जीव #chandrapur #bhadrawati


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात पुरात प्रवासी वाहन वाहून जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी यात वाहून जात होती. वाहनचालकाने टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात गाडी पुढे नेली. पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही त्याने गाडी थांबलली नाही. त्याच्या हलगर्जीपणामुळे 5 प्रवाशांचा जीव धोक्यात होता.
या गाडीत एकूण 5 प्रवासी होते. जिल्ह्यात विविध तालुक्यात दिवसभर कमी-अधिक मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. ही गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला.
माहिती मिळताच गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सुटीवर गावात आलेले निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य सुरू केलं. स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका झाली. निखिल काळे या सैनिकाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने