माजरी तिसर्‍यांदा जलमय, पुन्हा जन जिवन विस्कळीत #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

भद्रावती:- जोरदार मान्सुन चे आगमन झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमानात पाउस पडला. सर्व नदी नाले तलाव धरणं भरलेली आहे.त्यामुळे माजरी गावात नदीचे पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी काठच्या घरांना खाली करुन सुरक्षीत ठिकानी हलवीन्यात आले आहे. जनता स्वयं स्फुर्तिने मदतीला धाऊन येत आहे. मात्र प्रशासनाचे फार दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मुळात तिसर्‍यांदा माजरी गावात पुराचे पानी शिरले असल्याने लोकांचे हाल होत आहे.जवळच ओपन कास्ट कोळसा खान असल्याने त्या खानीतील मातीच्या ढिगार्‍याने पानी प्रवाहाला अळथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सुद्धा सलग तिसर्‍यांना पुराचे पानी गावात आणी लोकांच्या घरात शिरले आहे. त्यातच अप्पर वर्धा आणी इरई धेरनाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळी आनखीनच वाढली आहे. एका रात्री संपुर्ण माजरी गावात पाणी शिरले आहे.
आंबेडकर वार्ड, एकता नगर तसेच वार्ड न.३ मधे पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे जंगली जनावरे गावात शिरत आहे. तसेच रहदारीचे सर्व मार्ग बंद असल्याने जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरना नदी पुल, वर्धा नदी पुल पाटाळा येथे माजरी पोलीस प्रशासना मार्फत सुरक्षा प्रदान करण्याकरीता बंदोबस्त लावण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)