घरात शिरली निलगाय; पाहूण्यासारखी बसली घरात; कुटूंबीय वागले प्रेमानं...
चंद्रपूर:- चंद्रपूर तसा वाघांसाठी फेमस जिल्हा.वाघ बघण्यासाठी दुरवरून पर्यटक इथं येतात.तसं इथंले वन्यजीव जिल्हाचे वैभव ठरले असले तरी मानव-वन्यजीव संघर्षही इथं टोकाला गेलेला आहे.मात्र वरोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव-वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहीला.घरात शिरलेली निलगाय बिनधास्त एखाद्या पाहूण्यासारखी बसली होती.दुसरीकडे घरातील सदस्य न घाबरता तिला तितक्याच प्रेमानं घरात आसरा दिला.
वरोरा तालुक्यातील मजरा गावात आज नीलगाय आली.ती दोन घरांमध्ये शिरली. घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही निलगाय घरात पाहूण्यासारखी बसली होती.घरातील सदस्यांनी तिला तितक्याच प्रेमानं वागविलं.
मानव-वन्यजीव प्रेम सबंधाचा नवा अध्याय या वेळी दिसला.दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.जखमी नीलगाईस ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले .उपचारानंतर निलगायीला मुक्त अधिवासात सोडण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत