Top News

बगड खिडकी परीसरातील पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घराचे तत्काळ पंचनामे करा #chandrapur.भाजयुमो महानगर जिल्हा सचिव प्रवीण उरकुडे यांची नायब तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- गेल्या पंधरा दिवसांपासून चंद्रपूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे नागरिकांचा दैनंदिन जीवनात मोठा परिणाम पडला आहे.पावसामुळे कुठे पूर आला तर कुठे पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती सध्या बगड खिडकी परिसरातील आहे या ठिकाणी रामाला तलाव नाला तर दुसरी कडे झरपट नदी याचा मुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात आ. सुधीर मुनगंटीवार यांचा माध्यमातून धान्य किट व ताडपत्री वाटप करत होतो. तेव्हा येथील नागरिकांनी पावसामुळे झालेले नुकसानाची आपबिती भाजयुमो महानगर जिल्हा सचिव प्रवीण उरकुडे
 यांना सांगितली.
भाजयुमो जिल्हा सचिव प्रविण उरकुडे यांनी तत्काळ याची माहिती भाजपा चे वरिष्ठ नेते यांना दिली व त्या नंतर ज्या ज्या नागरिकांचे पावसाच्या पाण्यामुळे घराचे नुकसान झाले त्यांचे निवेदन तयार केले व आज नायब तहसीलदार श्री जितेंद्र गादेवार यांना परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. नागरिकांचे निवेदन देण्यात आले. व विनंती करण्यात आली की लवकरात लवकर या ठिकाणची पंचनामे करावे व पीडित नागरिकांना सरकार कडून मिळणारा आर्थिक मदत मिळवून द्यावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने