Top News

विरुर स्टेशन वनविभागाची धडक कार्यवाहीत सागवान जप्त #chandrapur#Rajura


राजुरा:- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील डोंगररांगांच्या परिसर असलेला अंतरगाव वनक्षेत्रात सागवान तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सागवान तस्करीचे ग्रहण लागलेले आहे. विरुर वनपरिक्षेत्राचे नुकतेच रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी या परिसरातील तस्करांचा मुसक्या आवळण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे.
त्यातूनच दिनांक २४ जुलै रोजी अंतरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा गैरफायदा घेवून सागवानाची मोठी तोड झाली असून ती लवकरच तेलंगणात तस्कर केली जाणार असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे भर पावसात अगदी परिसरात पूर आलेला असताना देखील त्यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकूण तोड झालेल्या ३० झाडांपैकी आरोपी सुदर्शन भोयर यांचे शेतातून १२ नग तर सरकारी नाल्यातून ५ नग आतापर्यंत हस्तगत करण्यात आले असून सरकारी नाल्यात अजूनही काही नग असल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने