Top News

देशभक्ती गीतावर चंद्रपूरात याेग नृत्य #chandrapur #dance

चंद्रपूर:- योग नृत्य परिवार ट्रस्ट, मुख्यालय, चंद्रपूर‌ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती गीतावर याेग नृत्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा ला महाराष्ट्र चे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रामुख्याने उपस्थित हाेते.


यावेळी माजी महापौर राखी कंचर्लावार माजी उपमहापौर राहुलभाऊ पावडे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थिती हाेते.

कार्यक्रमाला वन मंत्री सुधीर चे आगमन हाेताच पुष्प वर्षाव करुन त्याचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर भाऊच्या हस्ते दिपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करुन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सर्व प्रथम याेग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय, चंद्रपूरचे जनक भाई श्री गाेपालजी मुंदडा यांच्या हस्ते वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यानंतर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा जनक गाेपालजी मुंदडा यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, बांबुने बनविण्यात आलेले तिंरगा ची प्रतिकृती देऊन केले. त्याच बरोबर याेग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय, चंद्रपूर चे संघटक श्री सुरेश भाऊ घाेडसे, शशिकांत मस्के सर, ममता बाेकडे, यांचे पण सत्कार करण्यात आले. त्या नंतर याेग नृत्याला सुरूवात करण्यात आली. याेग नृत्य संपताच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा चे संचालन आशिष झा व रुषीपाल
यांनी केले. या सर्व कार्यक्रम ला फेसबुक लाईव्ह साै. काचनं आकाश घाेडमारे यांनी केले. या कार्यक्रमा ला यशस्वी करण्याकरिता याेग नृत्य परिवार मधील सर्व केंद्र प्रमुख ने पदाधिकारी व सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने