💻

💻

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस म्हणजे सेवेची संधी:- अल्का आत्राम #chandrapur


पोंभुर्णा:- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा महिला आघाडीच्या वतीने राजरजेश्वर मंदिरात अभिषेक करून भाऊंच्या दीर्घायुष्यासाठी कामना करण्यात आली.
तसेच अल्का आत्राम यांचे वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जि‌. प. शाळा येथे स्कूलबॅग वाटप करण्यात आले तसेच वनमजुराना भाजपच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, सुलभा पिपरे नगराध्यक्षा नगरपंचायत पोंभुर्णा, अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा, भाजपा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, नगरसेवक दर्शन गोरंटीवार भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा वैशाली बोलमवार, नगरसेवक नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, वैशाली वासलवार, मंजुषा ठाकरे, दर्शना शिरभैय्ये, माधुरी पंडिलवार, प्रिया मंगळगिरीवार, स्वरूपा मंगळगिरीवार, पुरुषोत्तम चोथले, पिंटू गौरकर, मारोती पिंपळशेडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत