Top News

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- जगलात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताडोबा बफर क्षेत्रातील महादवाडी येथे रविवारी घडली. शामराव जुमनाके (५०, रा. महादवाडी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
चंद्रपूर तालुक्यातील महादवाडी येथील शामराव जुमनाके हे आपली जनावरे चराईसाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने शामराव जुमनाके यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे गावकरी संतप्त झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने