ट्रक वर्धा नदीत कोसळला; ट्रक चालकाचा मृत्यू #chandrapur #ballarpur #Rajura

बल्लारपूर:- बल्लारपूर-राजुरा शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल असून सदर पूल सद्यस्थितीत धोकादायक बनत चालला आहे. पावसाळी दिवसात या पुलावर लावलेले कठडे काढून ठेवले जातात जे पावसाळा संपताच पूर्ववत लावले जातात. मात्र वर्तमान स्थितीत या पुलावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांचा जिव गेल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना काल पहाटेच्या सुमारास घडल्याचं वर्धा नदीच्या पात्रात ट्रक कोसळून एक चा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची मिळताच बल्लारपूर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले असुन बचाव पथकेने तत्काळ बचाव व शोध करत सुरू केले. घटनेत सध्यातरी एका माणसाच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बचाव पथकाने मृतदेह बाहर काढले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत