शालेय पोषण आहारावर मुख्याध्यापकाचा डल्ला! #Chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग आक्रमक

मुख्य कार्यपालन अधिकारी सह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुख्याध्यापकावर तात्काळ कारवाई करा अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा


पोंभुर्णा:- तालुक्यातील जूनगाव येथील मॉडेल स्कूल म्हणून प्रसिद्ध असलेली जिल्हा परिषद शाळा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातच अपराथापर करून घोटाळा केला असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि पालक वर्ग या सर्वांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस स्टेशन मुल यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनगाव येथे मुख्याध्यापक पदावर श्री खुशाबराव पिंपळशेंडे हे हे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेत अनेक अपराधपर झाल्याचे निदर्शनास येत आहे असे तक्रारकर त्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेत ५.८८ क्विंटल तांदूळ दर दोन महिन्याला येत असते. मागील शिल्लक २.५० क्विंटल तांदूळ असा एकूण ५.८८ शाळेत उपलब्ध असणे आवश्यक आहे परंतु परंतु सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता मोक्यावर केवळ पाच क्विंटल तांदूळ उपलब्ध आढळून आला. यावरून मुख्याध्यापक पिंपळशेंडे यांनी ३.८८ क्विंटल तांदूळ आढळून आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या मालकीचे दोन मोटर पंप होते त्यापैकी एकच आढळून आला. संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे या उदात्त हेतूने शासनाने शाळांना संगणक, सीपीयू, प्रिंटर इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. परंतु उपरोक्त साहित्यातून मुख्याध्यापकाने प्रिंटर परस्पर लंपास करून आपल्या घरी वापरत असल्याचा आरोप ही तक्रारीत करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक आपल्या पदाचा गैर उपयोग करून शाळा व्यवस्थापन समितीला व ग्रामपंचायतीला तथा पालकांना कसलाही विश्वासात न घेता आपल्याच बन मर्जीने काम करीत आहेत. या मुख्याध्यापकाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता तक्रारकर त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासूनचे सविस्तर लेखापरीक्षण केल्यास शाळेतील मोठा घबाळ उघडकीस येणार असल्याचे ठाम मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मुख्याध्यापकाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून गैरवर्तणूक गैरकृत्य आणि कर्तव्यात कसूर व शिस्त अभंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे. अन्यथा ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गाच्या मार्फतीने शाळेला कुलूप ठोकून पंचायत समितीवर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही तक्रारीतून देण्यात आलेला आहे.

तक्रारीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.होमिताताई पुनाजी मशाखेत्री, उपाध्यक्ष देवराव आभारे, सदस्य संजय रामचंद्र भोयर, महिला सदस्या निशाताई कृष्णदेव पाल, सरपंच सौ. पुनम ताई राहुल चुधरी, उपसरपंच श्री राहुल भाऊ पाल, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुलचंद दसरूजी चुधरी, माजी सरपंच तथा पत्रकार जीवनदास गेडाम, पुनाजी घनश्याम मशाखेत्री, रतिलाल बाबुराव गेडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.