Top News

राष्ट्रीय सरपंच संसदेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी महेश देवकते यांची निवड #chandrapur

चंद्रपूर:- नुकत्याच पुणे (pune) येथे राष्ट्रीय सरपंच (sarpanch) संसदेचे अधिवेशन पुणे येथील MIT युनिव्हर्सिटी मध्ये पार पडले. त्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्या मधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.त्या मध्ये MIT राष्ट्रीय सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचे सत्कार व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पार पडला.
त्या कार्यक्रम ला उदघाटन म्हणून केंद्रीयराज्यमंत्री सौ.डॉ. भरतीताई पवार तर अध्यक्ष म्हणून MIT चे कार्याध्यक्ष राहुलजी कराड उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (sudhir mungantiwar) हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये चंद्रपूर (chandrapur) जिल्हा अध्यक्ष म्हणून जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेशजी देवकते यांची निवड करण्यात आली.त्यानी अनेक लोकप्रतिनिधी व ग्राम पंचायत च्या विविध प्रश्न व विकासा बदल माहिती आणि देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन MIT राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थपक श्री. राहुलजी कराड व राष्ट्रीय प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील यांनी महेशजी देवकते यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
देश्याच्या शाश्वत व सर्वांगिण ग्राम विकास प्रकियेत पंचायतराज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोक प्रतिनिधींची भूमिका मध्यवर्ती व सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे राजकीय स्वरूपात संघटन करणे त्यांचे सर्वांगणी प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे ग्रामविकासाचे राष्ट्रीय स्तरावरील हे महत्त्वपूर्ण अभियान यशस्वीरित्या विस्तारित करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या आपल्यासारख्या कार्यरत व्यक्तीकडून हार्दिक सहकार्याची अपेक्षा आहे असे प्रतिपादन केले.त्याच्या निवडीने चंद्रपूर जिल्हातील अनेक लोकप्रतिनिधी व सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी समाधान व्यक्त केली आहे.त्या कार्यक्रम मध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्हिडिओ फोन च्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी याना मार्गदर्शन केले.
तर राहुलजी कराड यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांनी भविष्यात चांगले काम करावे आमची पूर्ण युनिव्हर्सिटी आपल्या सोबत कामे करतील अशी माहिती दिली. व सौ.भरतीताई पवार यांनी या राष्ट्रीय सरपंच संसदेने अनेक गावातील पदाधिकारी यांना विकासात्मक कामे करण्यासाठी मार्ग दाखवावा व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यत करावे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला.
त्याप्रसंगी महेश देवकते यांनी सदर पदाच्या माध्यमातून लोकांच्या सार्वजनिक विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांना योग्य मार्गदर्शन व योग्य सहकार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
#WorldCupQatar2022 #FIFAWorldCup #EnglandvsIran #BharatJodoYatra

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने