गडचिरोली:- शहरातील मुख्य रस्त्यावरून जाताना एका युवकाचा चायनीज मांज्याने गळा चिरुन गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी चार वाजताच्या दरम्यान अभिनव लॉन समोर घडली.
शासनाने चायनीज प्लास्टिक मांज्यावर बंदी घातली असताना सुध्दा, नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने दुर्दैवाने या युवकाचे प्राण संकटात सापडले होते.
मांज्याने जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सोमेश्वर आनंदराव केंडळवार (28) रा. सायमारा ता. सावली जि. चंद्रपूर आहे. भरधाव वाहतुकीत अचानक पणे पतंगीचा धागा वाहणासमोर आल्याने अचानक ही दुर्घटना होतांना शेकडो प्रत्यक्षदर्षी लोकांनी बघितली होती.
बाजारात खुलेआम मांजा विकणाऱ्या लोकांवर नगर पालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.