Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna



पोंभूर्णा :- अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून डावलल्याने पोंभूर्णा तहसिलीसमोर वेळवा माल,चेक वेळवा,सेल्लूर नागरेड्डी,चेक सेल्लूर या चारही गावच्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन केला. जोपर्यंत चारही गावांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत तहसिलीसमोरचा ठिय्या सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. तहसिलदार यांनी पुरपिडित शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


तालुक्यातील अंधारी नदी काठावर वसलेल्या वेळवा माल,चेक वेळवा,सेल्लूर नागरेड्डी, चेक सेल्लूर या भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला.

शासनाकडून अश्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या अनुदानातून येथील शेतकऱ्यांना डावलल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे लाभ मिळाले नाही.यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारला शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल आंदोलन पुकारला.यावेळी तहसिल कचेरीसमोर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला. जोपर्यंत या चारही गावांमधील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्याला घेऊन वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी सरपंच सिमा निमसरकार, उपसरपंच जितेंद्र मानकर, रूपेश निमसरकार, अजय लोणारे, महेश मेश्राम, पंकज वड्डेटिवार, रमेश कुळमेथे, श्रीकृष्ण चलाख, विनोद जाधव, संजीव जाधव, विनोद ठाकरे, मुर्लीधर मोरे, साईनाथ लोणारे, मधुकर मेश्राम, यांच्यासह शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत