MBBS प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर 52 लाखांची फसवणूक #chandrapur #nagpur #Fraud

Bhairav Diwase


नागपूर:- तमिळनाडूच्या तीन ठगांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, अशी थाप मारून नागपुरातील पालकाची 52 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एम. विजय कुमार (वय 46), अन्नू सॅम्युअल (वय 41) आणि जेकब थॉमस (वय 54) सर्व रा. वेल्लूर, तमिळनाडू अशी आरोपींची नावे आहेत.

झिंगाबाई टाकळी, सुमितनगर येथील ओमप्रकाश वंदेवार (वय 41) यांच्या मुलीने नीटची परीक्षा दिली. गुण कमी पडल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळू शकत नव्हता. काही लोकांनी एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी या तीन ठगबाजांची नावे सांगितले. फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधला. प्रत्यक्षात वेल्लूरला जाऊन चर्चा केली. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर येथे मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन मिळाले. 80 लाख रुपये लागतात, परंतु परिचयातून आल्याने 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले गेले. वंदेवार यांनी एक लाख रुपये दिले. यानंतरची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली. 52 लाख रुपये दिले गेले. प्रवेश मिळाला नाही. त्यांनी रक्कम परत मागितली. मात्र, पैसेही परत मिळाले नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.