Top News

वाईनशॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली; गुन्हा दाखल #chandrapur #crime


चंद्रपूर:- दारु दुकानदार आणि ग्राहक ह्यांच्यातील वाद नवे नाहीत. दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना चंद्रपूर येथिल जटपुरा गेटजवळ असलेल्या आनंद वाइन शॉप येथे घडली. दुकानाचे संचालक संदिप अडवाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाइन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने किरकोळ वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडली.

शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असुन मद्यापींची येथे कायम गर्दी असते. देशी तसेच विदेशी दारू शौकिन वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाइनशॉप सुरू केले. या वाइन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना बेवड्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो.

मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान एक ग्राहक वाइन शॉपमध्ये गेला असता शुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या घटनेने रस्त्यावर बराच वेळ वाहतुकीचाही खोळंबा निर्माण झाला होता. या मारहाणप्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने