वीज कोसळून नवीतल्या विद्यार्थीनीचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #deathचंद्रपूर:- शाळेतून घरी जाताना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने नववीतील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विटी सोमनकर (१६ रा. मालेरचक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अशात चामोर्शी तालुक्यातील मालेरचक गावातील स्विटी सोमनकर ही नववीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी परतताना वाटेतच तिच्या अंगावर वीज कोसळली. आसपासच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी तिला सुरुवातीला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपरचादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. स्विटीच्या मृत्यूने गावात आणि शाळेत हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत