बंदी असून सुद्धा अनेक पान मटेरियल दुकानात तंबाखूची खुलेआम विक्री? #Chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase

तंबाखू माफियांना अभय कुणाचे? बंदी फक्त कागदावरच?


कोरपना:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पुन्हा पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासना मार्फत चार महिन्यात एखादी थातूरमातूर कार्यवाही करून पुन्हा जैसे थे! अशी परिस्थिती निर्माण झाली.

या आधी गडचांदूर शहरातील अवैध सट्टा मटका चालक, तसेच कोंबडा बाजार चालवणाऱ्या काही गुन्हेगारांचे पोलिस प्रशासनाने त्यांचे धंदे बंद पाडले होते, पण आता ते लोक सुगंधी तंबाखू विक्री कडे वळले आहेत, यासाठी त्यांनी जुन्या लहान सहान तंबाखू विक्रेत्यांना आपले मुख्य केंद्रबिंदू मानत त्यांना आपल्याकडूनच तंबाखू विकत घेण्यासाठी परावृत्त करत आहेत.

एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात खुलेआम तंबाखू गुटखा विक्री जोरात सुरू आहे. यातील मोरक्या असलेल्या वनसडी येथील इरफान, मकसुद, नांदा येथील एक अवैध दारू विक्रेता गडचांदुर येथील अवैध दारू व्यवसायीक, अवैध सट्टा मटका चालक, कोंबडा बाजार व चिकनचे दुकान चालवणारा असे काही बेकायदेशीर धंदे चालवणारे व्यवसायिक मिळून आता सुगंधित तंबाखू विक्रीच्या मार्गी लागले आहेत, यासाठी त्यांनी शहरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक हाताशी धरले आहेत व स्थानिक लहान सहान पान मटेरियल वाल्यांना धारेवर धरत सुगंधी तंबाखू विक्रीचे रॅकेट चालवत आहेत. पोलिसांनी आताच त्यांच्या मुसक्या आवळने गरजेचे असल्यासचे काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा यामुळे भविष्यात सुगंधित तंबाखू विक्रीच्या कारणावरून मोठं मोठे वाद, भांडण, हाणामारी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे