चिमूर:- मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असलेले तसेच सध्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करीत असलेले सक्रिय नेते दिवाकर प्रभाकर निकुरे यांनी चंद्रपूर जिल्हा ओबीसी विभाग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. Hasty resignation of Congress OBC cell district president within a short period of time
एक महिन्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासूनच स्थानिक चिमूर विधानसभामध्ये काँग्रेसचा एक गट त्यांच्या विरोधात थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी करीत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने तसेच याच गटबाजीमुळे निकुरे यांनी आपला राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.