चुलीतून आगीचा भडका उडाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; युवकाचा होरपळून मृत्यू #chandrapur #Wardha #Fire #firenews

Bhairav Diwase
0


वर्धा:- शहरालगतच्या पुलफैल या झोपडपट्टी परिसरात घडलेली घटना दुर्दैवाची परिसीमाच ठरावी. गॅस सिलिंडर संपल्याने बाळू मसराम (२७) चूल पेटवण्यास बसला. एकाएकी चुलीतून आगीचा भडका उडाला आणि झोपडीवजा घराने पेट घेतला. त्यात बाळू होरपळून निघाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याची पत्नी व मुलगा घराबाहेर असल्याने ते वाचले.

मृत बाळू मसराम मजुरीचे काम करीत होता. या घटनेमुळे मजुरी करून जगणाऱ्या मसराम कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, परिसरही सुन्न झाला आहे. शहर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)