Click Here...👇👇👇

चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला #chandrapur #sun #Chandrapurkars

Bhairav Diwase

राज्यात सर्वाधिक तापमान; ४३.२ अंश सेल्सिअस नोंद


चंद्रपूर:- देशात सर्वाधिक उष्ण शहर असलेल्या चंद्रपूरच्या तापमानात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढ होऊ लागली आहे. आज, गुरुवारी चंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. येत्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्हा देशात 'हॉट सिटी' म्हणून ओळखला जातो. मार्च महिन्याच्या अखेरपासूनच चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्यात चंद्रपूरच्या तापमानाने राज्यात उच्चांक गाठला आहे. बुधवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले आहे. हे तापमान राज्यात सर्वाधिक आहे.

वाढत्या उष्णतामानामुळे चंद्रपूरकरांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्यामुळे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूरकरांनी घेतला आहे