मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू #chandrapur #bhadrawati #death

Bhairav Diwase
0


भद्रावती:- तालुक्यातील घोडपेठ येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासेमारीसाठी वापरण्यात आलेल्या हवा भरलेल्या ट्यूबवरून तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

अंकुश रमेश नागपुरे (२८), रा. भद्रावती असे मृताचे नाव आहे. मच्छिंद्र मछुआ संस्थेतर्फे हा तलाव सदस्यांना मासेमारीकरिता मंगळवार व बुधवारला रात्रपाळीसाठी देण्यात आला आहे. रात्रीला लावण्यात आलेल्या जाळ्यातील मासे काढण्याकरिता अंकुश हा आपल्या सहकाऱ्यासोबत तलावात गेला होता. मासे काढून झाल्यानंतर परतीच्या वेळेस अचानक हवा भरलेला ट्यूबवरून त्याचा तोल गेला व तो खोल पाण्यात बुडाला.

उपस्थित असलेल्या सदस्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)