Top News

युवकाने व्हॉट्सऍप स्टेटसला स्वतःचा फोटो ठेवून वाहिली श्रद्धांजली अन्... #Sangali #suicide #Chandrapur #Adharnewsnetworkसांगली:- सांगली (Sangli) जिल्ह्याच्या जत (Jat) तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

येळवी येथील 22 वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटलला (WhatsApp Status) स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

औदुंबर विजय जगताप याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जत पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने