Top News

वाघ नखे व इतर अवयव हस्तगत #tiger #chandrapur #jiwati


चंद्रपूर:- तेलंगणा राज्यातून वाघ नखे, दात व इतर अवयव हस्तगत करण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. सदर कारवाई सोमवार व मंगळवारी करण्यात आली. दरम्यान तेलंगणा राज्यातून वाघ नखे, दात व इतर अवयव हस्तगत करण्यात आले आहेत.

मध्य चांदा वनविभागातील जिवती वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची कातडी विकणार्या आंतरराज्यीय टोळीला रविवारी वनविभागाने पकडले होते. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली. सदर वाघाची शिकार तेलंगणा राज्यातील असिफाबाद नजीकच्या भागात झाल्याची माहिती समोर आली होती.

मध्य चांदा वनविभागातील जिवती वनपरिक्षेत्रांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत रविवारी ताब्यात घेतलेल्या आंतररज्यीय टोळीतील ६ आरोपींच्या तपासामधून जिवती वनविभाग व तेलंगणा वनविभागाच्या संयुक्त कारवाई मधे वाघाचे उर्वरित अवयवही ताब्यात घेण्यात पथकाला यश आले आहे. सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार,वनपरिक्षेत्राधिकारी संदीप लंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी ६ आरोपींना अटक करून राजुरा न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले. सर्व आरोपींना ३ दिवसांची वनकोठडी मिळाली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने