Click Here...👇👇👇

गणपती वार्डात रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई मध्ये योग्य मदत मिळावी #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
1 minute read

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन



Google ads.
चंद्रपूर:- 09 मे 2023 (मंगळवार) रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी गणपती वार्डातील रेल्वेच्या हद्दीत आलेल्या काही नागरिकांच्या घराची मोजणी करण्यात आली ज्यामध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांच्या घरांचा समावेश असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची PWD विश्रामगृह बल्लारपूर येथे भेट घेतली व आपली व्यथा सांगितली त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत भेट घेऊन या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.


तसेच स्थानिक तहसीलदार यांना गणपती वार्डाचा पुन्हा सर्वे करून या विषयांमध्ये नागरिकांना काय योग्य मदत करता येईल ती मदत तात्काळ करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे तसेच सोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व अन्य सहकारी यांची उपस्थिती होती.