https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- सध्या नवीन जिल्हा निर्मितीच्या चर्चा ब्रम्हपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत आधार न्यूज नेटवर्क शी बोलताना सामाजिक कार्यकर्ता ॲड.आशिष गोंडाणे ब्रम्हपुरी म्हणाले की जिल्ह्यासाठी सर्वगुण संपन्न असलेली ब्रम्हपुरी नगरी सर्व बाजुंनी सक्षम असून ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे यासाठीची मागणी सुरू आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे बोलत ब्रम्हपुरीत असणाऱ्या सोई सुविधा ॲड.आशिष गोंडाने यांनी बोलून दाखवल्या.बाकी शहराच्या तुलनेत ब्रम्हपुरी शहर आणि तालुका लोकसंख्या, भौगलिक, शैक्षणिक आणि आरोग्य इत्यादी दृष्टीने अत्यंत मोठे असून ब्रम्हपुरी शहरात १)महसूल उपविभाग २)पोलिस उपविभाग ३)विद्युत उपविभाग ४)वन उपविभाग ५)मृदा व जलसंधारण उपविभाग ६)जिल्हातील एकमेव शासकीय तंत्रनिकेतन ७)उपअधीक्षक भुमीअभिलेख ८)पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तानंद हॉस्पिटल समवेत ४० पेक्षा जास्त हॉस्पिटल्स तसेच १०० खाटांचे सर्व अद्ययावत सुविधा असलेले शासकीय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे मंजूर ९)ब्रम्हपुरी शहरात ५ सिनियर कॉलेज व्यतिरिक्त १)अध्यापक महाविद्यालय २)नर्सिंग कॉलेज ब्रम्हपुरी (GNM) तथा सुरबोडी येथे नर्सिंग कॉलेजचे बांधकाम सुरू
३) खासगी १ तथा शासकीय १ अश्या एकूण २ स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था ४)आदिवासी मुला-मुलींसाठी आश्रमशाळा ५)आदिवासी मुलींचे वसतिगृह १,मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह १,मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह १,नेवजबाई हितकरिणी शिक्षण संस्थेचे मुलांचे १ आणि मुलींचे १ असे एकूण २ स्वतंत्र वसतिगृहे ,
पंचशिल शिक्षण संस्थेचे मुलांचे १ आणि मुलींचे १ असे एकूण २ स्वतंत्र वसतिगृहे १०)राजर्षी शाहू महाराज निराधार महिलांचे वसतिगृह ११)स्टेट बोर्डाच्या निकालासाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रीस्तानंद कॉन्व्हेन्ट व्यतिरिक्त आणखी ९ प्रसिद्ध कॉन्व्हेन्ट
१२)चौगान येथे प्रशासकीय महाविद्यालय,कृषी तंत्रनिकेतन,तथा कनिष्ठ महाविद्यालय १३)बेटाळा येथे डीफॉर्म,बिफॉर्म,DMLT, PGDMLT तथा कनिष्ठ महाविद्यालय १४)पिंपळगाव,गांगलवाडी,मुडझा येथे कनिष्ठ महाविद्यालय १५)राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा ब्रम्हपुरी शहरात आयोजित केल्या जातात तसेच बॉस्केटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल,सॉफ्टबॉल,बेसबॉल,टेबलटेनिस,स्विमिंग,कुस्ती,कबड्डी,खो-खो,क्रिक्रेट,बॅडमिंटन ईत्यादी खेळ खेळले जातात,तसेच नगरपरिषदचे भव्य क्रीडासंकुल,यासमवेत ब्रम्हपुरी शहरात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग स्पर्धा आयोजित होतील असे भव्यदिव्य स्विंमिंग पुलाचे बांधकाम सुरू आहे.१६)जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन होण्याकरिता लागणारी जागा,अधिकारी निवासस्थान आणि पोषक वातावरण केवळ ब्रम्हपुरी शहरात उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत १६ कोटी पेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेली महसूल विभागाची भव्यदिव्य इमारत उभारली जात आहे तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाची ९ करोड ३० लाख अंदाजपत्रक असलेली नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
१७)ई-लायब्ररी चे बांधकाम प्रगतीपथावर असून याव्यतिरिक्त शहरात ५ पेक्षा जास्त सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहेत.१८)ब्रम्हपुरी शहरात ५ राष्ट्रीयकृत बँक याशिवाय HDFC,ICICI,UNION BANK,AXIX BANK,CDCC,नागपूर ग्रामीण बँक,भंडारा ग्रामीण बँक,बुलढाणा अर्बन बँक,श्रीराम सिटी,ब्रम्हपुरी अर्बन बँक,ब्रम्हपुरी मल्टीसीटी बँक यांच्या समवेत शहरात मोठ्या प्रमाणात पतसंस्था कार्यान्वित आहेत.१९)ब्रम्हपुरी तालुक्यात ९ पेट्रोल पंप २०)ब्रम्हपुरी शहरात देशात दुसरा क्रमांक पटकाविलेल्या राईस ब्रान ऑईलची कंपनी असून मोठमोठ्या राईस मिल्स असून ब्रम्हपुरीतील तांदूळ विदेशात निर्यात केला जातो.
याशिवाय आणखी बऱ्याच जमेच्या बाजू ब्रम्हपुरीच्या बाजूने आहेत.