चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा:- वंदना शेंडे #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

ब्रम्हपुरी:- आम्ही महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहोत.जिथे महिलांवर अत्याचार होतात तिथे आम्ही आवाज उठवतो.पण सध्या आमच्या भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांचे चरित्र हनन करण्याचा प्रकार मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करीत आहेत.हा प्रकार एक महिला म्हणून आम्ही सहन करू शकत नाही,शांत बसू शकत नाही.
आ.जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्रौ १२.५३ वा.चित्राताई वाघ संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केले आहे.चित्राताई वाघ यांची मानहानी करण्याचा,त्यांना बदनाम करण्याचा,त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊन सामाजिक जीवनातून उठविण्याचा,प्रकार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मॉं जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहे.हे सहन केले जाणार नाही.म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या चित्राताई वाघ यांची ट्विटरवर बदनामी करून,मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदनाताई शेंडे यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांना निवेदन देताना भाजपा जिल्हा सचिव तथा माजी जि.प.सदस्या ऍड.दिपालीताई मेश्राम,महिला मोर्चाच्या तालुका महामंत्री तथा माजी पं.स.सदस्या उर्मिलाताई धोटे,महिला मोर्चाच्या सदस्या वर्षाताई चौधरी,माजी नगरसेविका डॉ.हेमलता नंदुरकर,नगरसेविका पुष्पाताई गराडे आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)