पोंभुर्णा:- सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अश्यातच पोंभुर्णा-आक्सापूर मार्गांवर बेरडी जवळील पाण्याच्या प्रवाहात चक्क नाल्यात कार वाहून गेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. एक किलोमीटर अंतरावर कार सापडली पण कारचालक अद्याप बेपत्ता आहे. कारचालक अमित गेडाम पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. आणि त्यांच्याकडे गोंडपिपरीच्या शासकीय गोदामाचा प्रभार होता. घटनास्थळी कोठारी पोलीस दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पाण्याच्या प्रवाहात चक्क वाहून गेली कार; चालक बेपत्ता #chandrapur #pombhurna #gondpipari
Reviewed by Bhairav Diwase
on
शुक्रवार, जुलै २८, २०२३
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत