Top News

असले बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते:- अल्का आत्राम chandrapur pombhurna


 पोंभूर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाली. मागील आठवड्यात एकाच दिवशी तब्बल २४० मिमी पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात पडला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अशात पोंभूर्णा नगरपंचायतीच्या नवनिर्मीत इमारतीच्या पीओपीचा पाच फुटाचा एक साधा तुकडा पडला. त्यानंतर लगेच या इमारतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची ओरड काही महाभागांनी सुरू केली.

जणू या इमारतीचे काहीतरी नुकसान व्हावे आणि आम्हाला ओरडायला संधी मिळावी, याचीच वाट कदाचित 'हे महाभाग' बघत बसले होते की काय,? असे आता वाटू लागले आहे. विकास काय असतो आणि कामे कशी खेचून आणावी लागतात, हेसुद्धा ज्यांना माहिती नाही. अशा लोकांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखे आहे, असे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम म्हणाल्या.

संततधार पावसामुळे आलेल्या ओलाव्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचा पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या छताचा तुकडा पडला. या घटनेतून काहींनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला असून नागरिकांनी अशा निराधार आरोपांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अल्का आत्राम यांनी केले आहे.

पोंभुर्णा नगरपंचायतीच्या छताचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात इमारतीचे छत सुरक्षित असून आतील बाजूने केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा तुकडा सततच्या पावसाच्या ओलाव्याने खाली पडला होता. अवघ्या काही तासातच संबंधित विभागाने तातडीने या कामाची दुरुस्ती केली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्णतः सुरक्षित असताना येथे येणाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. असा कोणताही प्रकार नसताना नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे असल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. असे यापुढे बिनबुडाचे आरोप खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा सज्जड इशाराही भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम यांनी दिला आहे.

#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने