पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल निर्मुलन कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- सिकलसेल ॲनिमिया मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा वर्ष २०४७ पर्यंत संकल्प असल्याने मध्यप्रदेशातील शहादोल जिल्ह्यात राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन अभियानाचे पंतप्रधानाच्या हस्ते १ जुलैला उद्घाटन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सिकलसेल निर्मुलन मिशन कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.

यावेळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते विनोद चांदेकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना बावणे,ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिकेत गेडाम,वैघकीय अधिकारी डॉ.शुभम तुमराम,वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी तुमडे तसेच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थितीत होते.

याप्रसंगी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल ॲनिमियाची चाचणी करून संशयित रुग्णांना सिकलसेल जनुकीय स्थितीच्या कार्ड चे वितरण करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड सबंधित माहिती देण्यात आली.तसेच आभा कार्डची नोंदणीही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)