शैक्षणिक सत्र 2023 - 24 करिता पदवी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार chandrapur Gadchiroli

Bhairav Diwase
0
व्यवस्थापन परिषद अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांच्या मागणीला यश 


 चंद्रपूर:- विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले. घोषित करण्यात आलेले निकाल धक्कादायक आहेत.केवळ २९ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झालेअसून , ७१ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेशाची गंभीर समस्या निर्माण झालेली होती. उन्हाळी २०२३ परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे ,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्र २०२३- २४ करिता सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व सेमिस्टर मध्ये प्रवेश मिळावा यासाठी व्यवस्थापन परिषद -अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांच्याकडे मागणी रेटून धरलेली होती.विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या गंभीर समस्या कडे विद्यापीठाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर २०२३ च्या व्यवस्थापन परिषदेत गुरुदास कामडी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये प्रवेश देण्याचा प्रश्न मांडून. या गंभीर समस्येकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर विद्यापीठ प्रशासनाने विद्या परिषदेच्या बैठकीत उन्हाळी २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता विशेष संधी म्हणून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२३ परीक्षेत ७४००० परीक्षार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी केवळ २२००० परीक्षार्थी पास झालेले असून, ५२००० परीक्षार्थी अनुत्तीर्ण झालेले होते. उत्तीर्ण निकालाची टक्केवारी केवळ २९ टक्के होती. उन्हाळी २०२३ च्या परीक्षेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अनुत्तीर्ण झाल्यामुळे, पदवी व उच्च शिक्षणापासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार होते. पदवी व उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढून. अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांविना ओस पडणार होती. विद्यार्थीविना महाविद्यालय अशी गंभीर समस्या निर्माण झाली होती. या गंभीर समस्ये कडे व्यवस्थापन परिषद - अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधून अनुत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशा अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये . शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता विशेष बाब म्हणून प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केलेली होती. उन्हाळी २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिनांक २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत विद्यापीठात नोंदणी करावी. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली परिपत्रक जा.क्रं./गो.वि./परीक्षा विभाग/२४६०/२०२३ दिनांक २१ सप्टेंबर २०२३ च्या परिपत्रकानुसार कँरी फारवर्ड च्या पध्दतीनुसार शैक्षणिक सत्र २०२३-२४ करीता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)