आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " मेरी माटी मेरा देश

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " मेरी माटी मेरा देश" या कार्यक्रम अंतर्गत अमृत कलश पूजन कार्यक्रम दि. १८/०९/२०२३ रोज सोमवारला घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . शुभांगी वडस्कर  कार्यक्रमाचे अतिथी श्रीमती किरण ताई रोटेले  रजिस्टर यांनी अमृत कलशाचे पूजन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयम सेवक 
🎁

कु. रिया रॉय,मयुरी तरारे , रुतुजा भजभुजे, सोनाली कोलते, विपुल देहारे,
चेतन लोनबले , रोशन चौधरी आणि 
कार्यक्रम अधिकारी डॉ. सी.जे खंगार
यांनी अमृत कलशाचे पूजन केले.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ.सी खंगार
( कार्यक्रम अधिकारी ) यांनी  प्रास्ताविकेतून महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संक्पनेतून " मेरी माटी मेरा देश" हा कार्यक्रम राष्ट्रिय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावर अमृत कलश वृक्षारोपण, परिसर स्वच्छता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करावा असे प्रास्ताविकेतून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी वडस्कर यांनी वृक्षारोपण ,परिसर स्वच्छता असे कार्यक्रम घेण्यात येतील असे मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कुं. रश्मी डफ यांनी केले व आभार प्रदर्शन कु. सलोनी साहारे यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)