शाळा कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी मिशन IAS चा अभिनव उपक्रम
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील आयएएस होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवायचा असेल तर सर्व स्तरातून प्रामाणिकपणे प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर वयाच्या २२ व्या व २३ व्या वर्षीही मुले सनदी किंवा राजपत्रित अधिकारी होऊ शकतात .त्यासाठी मिशन आयएएस संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करीत आहे. मिशन आयएएस ही भारतामध्ये गेल्या २३ वर्षापासून काम करीत असून, डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी संपूर्ण भारतात आत्तापर्यंत १५०००व्याख्यान दिलेली आहे. याशिवाय त्यांनी स्पर्धा परीक्षा संदर्भात आतापर्यंत ७३पुस्तके लिहिलेली आहेत .भारताच्या राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी असणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी थेट गाव पातळीवर संवाद साधून .मी आयएएस व आयपीएस अधिकारी होणारच ही संकल्पना साकार करण्यासाठी शाळा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन -शिबिर व संवाद चर्चासत्र व्यापक स्वरूपात संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करण्यात येत असून, यात मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्तरावरील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस मिशनचे प्रमुख अकादमी संचालक डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रसंगी मुख्य अतिथी मार्गदर्शक म्हणून (खडतर सेवा पदक ,विशेष सेवा पदक ,प्राविण्य पूर्ण सेवा पदक, केंद्र शासनाचे इंटरनल सेक्युरिटी मेडल गौरव प्राप्त )मा. डॉ. दिलीप झलके . मा. अप्पर पोलीस आयुक्त नागपूर शहर यांची उपस्थिती राहणार आहे. अतिथी म्हणून
(आय.ए.एस.lASमिशन ) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संवाद
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जनमंच नागपूर सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, राहणार असून विविध पातळीवरील शासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी यांची उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन व संवाद साधला जाणार आहे . सदर कार्यक्रम रविवार दिनांक २४सप्टेंबर सकाळी ११.०० वाजता श्री. साई आयटीआय (जुनी मनोहर टॉकीज) जैन मंदिर रोड भद्रावती, विद्यार्थ्यांची भेट. व कार्यक्रम
सायंकाळी ५..००वाजता चिरादेवी ग्रामस्थळी समाजभवन परिसरात शेतकऱ्यांच्या मुलांनशी थेट संवाद व मार्गदर्शन राहील.
सोमवार दिनांक २५सप्टेंबर २०२३ ला सकाळी ९.०० वाजता डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय व शिंदे महाविद्यालय भद्रावती. येथे
सकाळी११.३० वाजता हजारो विद्यार्थ्यांशी संवाद व मार्गदर्शन . त्यानंतर कै. नीळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे विविध स्तरावरील कॉलेज महाविद्यालय संयुक्तिक स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन व संवाद राहणार आहे.
दुपारी २.००वाजता चंद्रपूर महामार्गावरील ताडाळी येथील ग्रामपंचायत परिसर सभागृहात शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांसोबत संवाद व मार्गदर्शन राहील.
मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ला सकाळी ८.३० वाजता मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित विविध शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संवादपर चर्चा, दुपारी १.०० वाजता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथील नियोजित मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम राहणार आहे. (आयएएस IASमिशनच्या) अभिनव अशा कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचेआव्हान मुख्य संयोजक आयएएस lASमिशन, जनमंच , सर्व आयोजक महाविद्यालय विभाग तथा प्राचार्य प्रमुख आदींनी केले आहे .