चंद्रपूरात रुग्णाच्या नातेवाईकाकडून डाॅक्टरांना मारहाण #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पाेलीसांनी दाेघांना अटक केली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सातत्याने हल्ला हाेत असल्याने वैद्यकीय संघटना देखील आता पुन्हा एकदा आक्रमक हाेण्याची शक्यता आहे.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका डॉक्टरला नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डाक्टरांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे असेही पाेलीसांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)