चंद्रपूर:- शासनाने शासकीय नोकरी कंत्राटी/ खाजगीकरण जीआर (GR) रद्द करावी, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारने बाह्य यंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती रद्द करावी, 'दत्तक शाळा योजना' रद्द करावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण व नोकरी बचाव समितीने एल्गार पुकारला.
देशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्रात सरकारने केलेल्या खासगीकरणाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी धरणे आंदोलन दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.