Top News

बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून सोने लुटले #chandrapur #Arrested #theft



चंद्रपूर:- आम्ही बँकेचे अधिकारी आहोत, तुम्हाला पंतप्रधान किसान योजना अंतर्गत १ लाख ४० हजार व बैलगाडीसाठी ३ लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी अगोदर २२ हजार रूपये नगदी भरावे लागतील असे सांगून वरोरा तालुक्यातील येन्सा येथील मंजुळाबाई नथ्थ्यूजी झाडे (६५) या महिलेची ३८ हजारांचे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या अमरावती येथील आरोपी रामराव भिमराव ढोबळे याला अटक केली आहे.



अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील मूळ रहिवासी असलेल्या रामराव ढोबळे याने साथीदारासह वरोरा तालुक्यातील येन्सा येथील रहिवासी असलेल्या मंजुळाबाई नथ्थुजी झाडे या महिलेची फसवणूक केली. महिनेची सोन्याची पोत व कानातील बिया असे ३८ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने आरोपीतांनी फसवणुक करून सोबत घेवून पळून नेले. या प्रकरणी वरोरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच दिवशी दुपारच्या दरम्यान त्याच आरोपीतांनी मौजा भटाळी येथे त्याचप्रकारचा आणखी दुसरा गुन्हा केला.



दोन्ही गुन्हे एकाच प्रकारचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी रामराव ढोबळे यांने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपी ढोबळे याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली होन्डा शाईन गाडीर जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता, आरोपीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने