भजी खाण्याचे आमिष दाखवून साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0


चिमूर:- तालुक्यातील चार वर्षाच्या बालिकेवर एका 34 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल रविवारी उघडकीस आली. पोलीसांनी आरोपी अमोल गौतम खोब्रागडे याला अटक केली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाणे अंतर्गत साडेचार वर्षाची बालिका रविवारी आपल्या मैत्रिणीच्या घरी खेळत होती. त्या मैत्रिणीच्या घराजवळ आरोपीचे घर आहे. आरोपीने त्या चिमुकलीला भजी खाण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले. आणि अत्याचार केला.


बालिका घाबरून रडत रडत आपल्या घरी आली. तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितला. आई-वडील शेतावर गेलेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. सदर घटनेची तक्रार भिसी पोलीस ठाणे येथे केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. पहाटे पोलीसांनी आरोपी अमोल गौतम खोब्रागडे याला अटक केली. बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)