चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक ठार, दोघ जखमी #chandrapur #mul

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- शेतकाम करीत असताना वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. ही घटना मूल तालुक्यातील चिचाळा येथे शेतशिवारात रविवारी (ता. १) दुपारी बारा वाजताच्यादरम्यान घडली.
मृत महिलेचे नाव चंद्रकला संजय वैरागडे (वय ४५) असे आहे. आशा रवींद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी अकरा वाजता वातावरणात अचानक बदल झाला. पावसाच्या सरीसह कडकडाट आणि गडगडाटाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तासापर्यंत वातावरणात कडकडाट सुरू होता. याच वातावरणात तालुक्यातील चिचाळा कवडपेठ मार्गावर असलेल्या चंद्रकला संजय वैरागडे यांच्या शेतात सात महिला धान पिकाच्या शेतीतील निंदा काढण्याच्या कामी होत्या. त्यापैकी शेतमालक चंद्रकला संजय वैरागडे यांच्या अंगावरच वीज पडल्याने त्यांचा जागीच शेतशिवारात मृत्यू झाला. आशा रवींद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर या दोन महिला जखमी झाल्या.
इतर महिलांना कोणतीही इजा पोहोचली नाही. जखमी झालेल्या महिलांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृत महिला चंद्रकला संजय वैरागडे या अल्पभूधारक शेतकरी होत्या. या घटनेमुळे चिचाळा गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि जखमी महिलांच्या कुटुंबीयांना तत्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)