मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा सिमेंट पाईपमध्ये गुदमरून मृत्यू #chandrapur #mul

चंद्रपूर:- मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा तलावातील सिमेंटच्या मोठ्या पाईपमध्ये गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मुल तालुक्यातील चिखली येथे आज (दि.१) सकाळी अकराच्या सुमारास घडली. अंकुश किसन शेंडे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आज सकाळी अंकुश मित्रासोबत चिखली येथील भसबोळण तलावात मासेमारी साठी गेला होता. नहर बंद असल्याने येथे पाणी नव्हते. त्यामुळे ते तलावातील सिमेंटच्या मोठ्या पाईपकडे गेले. मासेमारीसाठी मोठया पाईपात उतरल्यानंतर त्याला तिथून बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे पाईपातील पाण्यातच त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

त्याचा मित्र नहराच्या काठावरच उभा होता. बराच वेळ झाल्यानंरतही अंकुश बाहेर न आल्याने तो घाबरला. गावात जावून त्याने नागरिकांना माहिती दिली. गावक-यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाईपमधील पाण्यात फसलेल्या अंकुशला बाहेर काढले. तोपर्यंत त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकणाची मूल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत