'या' शुल्लक कारणावरून मामीनेच केला भाच्याचा गेम #murder #jalgaonजळगाव:- जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्यानं भुसावळमध्ये 31 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे हा खून तरुणाच्या मामीनेच केला आहे.

या तरुणाने मामे बहिणीच्या विवाहासाठी मामीला उधार पैसे दिले होते, ते पैसे वापस मागितल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?

भुसावळ येथे उधारीच्या पैशावरून 31 वर्षीय तरुणाची त्याच्या मामीनेच आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. नजीर शेख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. नजीरने आपल्या मामे बहिणीच्या विवाहासाठी उधारीवर पैसे दिले होते. त्याने मामीकडे आपले पैसे परत मागितले.

पैसे परत मागितल्याचा राग आल्याने मामीने आपला भाऊ आणि भाच्याच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नजीर शेख याचा मृत्यू झाला आहे. मामीनेच आपल्या भाच्याची हत्या केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत