Top News

शिबिरे केवळ औपचारिकता न राहता, त्याकडे संधी म्हणून बघून काम करा:- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे #chandrapur


सरदार पटेल महाविद्यालयात रासेयो ची कार्यशाळा संपन्न



चंद्रपूर:- पूर्वी सामाजिक एकोपा होता, पण आता या अत्याधुनिक युगात तो आटला आहे. तो पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज प्रतिपादित करीत राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे घेतली जाणारी शिबिरे ही केवळ औपचारिकता न राहता त्याकडे संधी म्हणून बघून काम करा असा मोलाचा सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिला.

गोंडवाना विद्यापीठ व येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी यांची संयुक्त वार्षिक नियोजन कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर, मार्गदर्शक रवींद्र कासखेडीकर, अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, गोंडवाना विद्यापीठ रासेयोचे संचालक, डॉ. श्याम खंडाळे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, गडचिरोली जिल्हा समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे, विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे विस्तीर्ण पसरलेले आहेत. या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना उच्च शिक्षणाच्या धागेत आणण्याची गरज आहे. त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यातील असे सुमारे २ हजार ६०० गावातील माहितीचे संकलन करणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे मागील वर्षी बांधलेले बंधाऱ्याची स्थिती आज कशी आहे, हेही बघणे गरजेचे असून उर्जा व वेळ वाया जाऊ नये असेही ते म्हणाले.



‘रेड क्रॉस’ नंतर राष्ट्रीय सेवा योजना हे दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंसेवी संघटन आहे. व्यक्तिमत्व विकासाचे ते उत्तम माध्यम आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात दुरावलेला समाज पूर्वीसारखा पूर्ववत करावा लागेल त्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन एन. डी. पाटील यांनी केले.



यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर म्हणाले की, गोंडवाना अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेची कामगिरी उल्लेखनीय होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उत्तम असून या माध्यमातून नवे राष्ट्रीय उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.


यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रासेयो कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक व रासेयो स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजया गेडाम, संचालन रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी केले. यानंतर 'अपघात मुक्त भारत' व ' विद्यापीठात रासेयो अनुदान' या विषयावरील दोन सत्रात उपस्थित प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी यांना रवींद्र कासखेडीकर व डॉ. श्याम खंडाळे या वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, गडचिरोली जिल्हा समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ.राजकुमार बिरादार, डॉ. वंदना गिरडकर, डॉ. निखील देशमुख यांनी परिश्रम घेतले.



दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, जिनेश पटेल, आ.किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने