Top News

BJP च्या जुमलेबाजी ला व काँग्रेस च्या घराणेशाहीला कंटाळून गडचांदूर व राजुरा मधील नागरिकांचा आम आदमी पक्षात प्रवेश व नियुक्ती.

BJP च्या जुमलेबाजी ला व काँग्रेस च्या घराणेशाहीला कंटाळून गडचांदूर व राजुरा मधील नागरिकांचा आम आदमी पक्षात प्रवेश व नियुक्ती.


राजुरा:- सविस्तर वृत्त असे की, राजुरा विधानसभा क्षेत्रामधील जनतेने निवडून दिलेल्या विविध पक्ष तथा संघटने कडून विकासाच्या नावाखाली खोटे आश्वासन देऊन निवडून आलेल्या आमदारांना सत्ता उपभोवण्याची संधी दिली. परंतु राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये  काही नवीन आमदार निवडून आले तर काहींना परत आणखी संधी मिळाली परंतु बदलत्या आमदारानुसार राजुरा विधानसभा क्षेत्रामधील विकासात कुठलाही बदल पडला नाही. अशाच काही खोटे आश्वासन देणाऱ्या आजी-माजींना कंटाळून आज दिनांक- ०७/०१/२०२४ ला राजुरा येथील आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयामध्ये गडचांदूर येथील BJP व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व राजुरा मधील नागरिकांनी BJP च्या जुमलेबाजी ला व काँग्रेस च्या घराणेशाहीला कंटाळून आम आदमी पक्षाने जे काम दिल्ली, पंजाब मध्ये करून दाखविले त्या कामाचे कौतुक करत हा एकमेव असा पक्ष आहे जो आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था यासह जनतेच्या अत्यावश्य गरजा पूर्ण करण्याचा दृष्टिकोनातून काम करतो. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे जनहितार्थ काम  आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे हे करतात त्या कामाला प्रेरित होऊन महिला व पुरुषांनी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

याचबरोबर श्री. सिद्धेश्वर कोल्हाटवार यांची आम आदमी पक्षाच्या तालुका संगठन मंत्री, राजुरा आणि श्री. महेश ठाकरे यांची तालुका सहसंगठन मंत्री, युवा, राजुरा या पदी नियुक्ती करण्यात आली.
   या पक्ष प्रवेश करणाऱ्या राजुरा येथील महिला सौ. प्रतीक्षा पिपरे, सौ. सरीता कोडांवार,
व गडचांदूर येथील श्री. विजय टेकाम, सुनील येमुलै, दिनेश सौनटके, सुनील आळे, रामचंद्र आगलावे यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी उपस्थित मा. श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यासह आम आदमी पक्षाचे गडचांदूर येथील शहर अध्यक्ष श्री. मिलिंद सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष, राजुरा श्री. रोशन बंडेवार, निखिल बाजाईत, राहुल चव्हन, अजय टाक व सहकारी महिला आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने