Top News

शेतात जेवतानाच सापाने घेतला चावा #chandrapur #nagbheed

नागभीड:- शेतावर तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास नवखळा शिवारात घडली.


सायत्रा वामन नारनवरे (५५) रा. नवखळा असे मृत महिलेचे नाव आहे. सायत्रा या स्वतःच्याच शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. शेंगा तोडून झाल्यानंतर त्या दुपारच्या जेवणासाठी बांधावरच बसल्या. जेवण सुरू असताना त्यांना सापाने दंश केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने