राज्यभरामध्ये महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जय भवानी कामगार संघटनेचं समर्थन- श्री. सुरज ठाकरे

Bhairav Diwase
राज्यभरामध्ये महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जय भवानी कामगार संघटनेचं समर्थन-  श्री. सुरज ठाकरे 


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना कामगारांचा हक्क मिळावा याकरिता नेहमी न्याकरिता  संघर्षाच्या भूमिकेत असणारे मा. श्री. सुरजभाऊ ठाकरे जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक तथा कामगार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांचे २०२४ चे महानिर्मिती, महापारेषण, महावितरण येथील कंत्राटी कामगारांच्या एकूण १७ विविध रास्त मागण्यांना घेऊन दिनांक- २८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जय भवानी कामगार संघटना, चंद्रपूर तथा आम आदमी पक्ष, चंद्रपूर चा दिनांक- १/ मार्च/ २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य संयुक्त समिती चे अध्यक्ष / सचिव यांना आंदोलन यशस्वी होऊन कामगारांच्या सर्व रास्त मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता समर्थन/पाठिंबा पत्र देत या आंदोलनामध्ये जय भवानी कामगार संघटनेच्या युनियन मधील सर्व कामगार आपल्या सोबत भविष्यात खांद्याला खांदा लावून काम करू असे जाहीर केले असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीमध्ये मा. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये दोन कामगारांना देखील समाविष्ट केले आहेत.