Click Here...👇👇👇

वीज अंगावर पडून 11 जणांचा मृत्यू death

Bhairav Diwase

मराठवाडा:- मराठवाड्यात १ जूनपासून पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ११ जणांचा मृत्यू वीज अंगावर पडून झाला आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


गेल्या दोन दिवसांत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाशी संबंधीत घटनांमध्ये चार जण दगावले. मराठवाड्यातील आठ पैकी सात जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून वादळी वारे, पाऊस आणि वीजा कडाडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्याने १४ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी चार बळी गेल्या दोन दिवसांत घडले आहेत.


पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर गोठ्याची पडझड झाल्याने एकाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक चार मृत्यू झाले आहेत, तर परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन मृत्यू झाले आहेत. जालना, हिंगोली, बीड आणि धाराशिव या इतर चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याचे सरकारी सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. १ जूनपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे २५१ जनावरेही दगावली आहेत.