इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! #Pune

Bhairav Diwase
0

अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढत केले लैंगिक अत्याचार
पुणे:- सोशल मीडियाने तरुणाईला वेड लावले आहे. सोशल मीडियावर मैत्री करणे, प्रेमात पडणे या घटनांमुळे पालकांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. सोशल मीडियावर मैत्री करणे पुण्यातील एका 15 वर्षाच्या मुलीला चांगलेच महागात पडले आहे. इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी ओळख केली. तिला आपल्या जाळ्यात ओढत नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 19 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.12) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शाहीद सुलतान शेख (वय-19 रा. मिठानगर, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत आरोपीच्या नातेवाईकाच्या घरात घडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याच्या इंस्टाग्राम आयडीवरुन फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत अन् त्यानंतर प्रेमात झाले. शाहीत शेख याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला भेटण्यासाठी बोलवून घेत नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.


शारीरिक संबंध ठेवताना शाहीद याने पिडीत मुलीचे अर्धनग्न फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्याने ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ शाहीद शेख याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)