(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी डीप कोळसा खाणीत कामाला असलेल्या सास्ती येथील तरुणांचा सास्ती -बल्लारपूर मार्गवरील वर्धा नदीच्या पुलावर 1 जुलै ला सकाळी 8 च्या सुमारास झालेल्या अपघातात घटनास्थळी दुर्दवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक तरुणाचे नाव सचिन अशोकराव पत्तीवर असून तो काही दवसापूर्वीपासून चंद्रपूर येथे राहात होता तिथून ये-जाकरतांना नेहमीप्रमाणे सकाळी ड्युटीला येताना समोर गाडी असल्याचे पाहून पुलावर खड्डा चुकविताना तोल गेल्याने डोक्याला जबर मार बसला अखेर घटनास्थळीच मृत्यू झाला तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याचे मागे पत्नी व एक मुलगा आहे.
घटनेची बातमी कळताच सास्ती-बल्लारपूर वासियांनी एकच गर्दी केली सचिन हा स्वभावाने अतिशय चांगला होता असल्याने गावात व त्याचे परिवारात दुःखचा डोंगर कोसळला आहे त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अचानक जाण्याने आप्तेष्ट अत्यंत भावुक झाले होते