Joining BJP: किशोर जोरगेवारसह नम्रता आचार्य-ठेमस्कर यांचा भाजपामध्ये प्रवेश

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार आज भाजपवासी झाले. किशोर जोरगेवार यांच्यासोबत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या नम्रता आचार्य -ठेमस्कर या देखील भाजपात प्रवेश घेतला आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा हो-नाही करत अखेर भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. २०१९ साली अपक्ष म्हणून निडणून आलेल्या किशोर जोरगेवार यांनी २०२२ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर किशोर जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता.


दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत यंग चांदा ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

तसेच नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप करत काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनाम्यापेक्षा त्यांनी केलेल्या आरोपाची मोठी चर्चा झाली होती. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा उपस्थितीत आज नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यांच्यासोबत कॉग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या भाजपात प्रवेश झाल्याने भाजपला लाभ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.