मुल:- मुल तालूका सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष, भेजगांव ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मुलचे संचालक, मुल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातले काँग्रेसचे वजनदार नेते अखिल गांगरेड्डीवार हे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बल्लारपूर विधानसभे चे महायुती चे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार विद्यालय येसगाव येथील जाहीर सभेत आपल्या 300 कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांना पक्ष प्रवेश देऊन स्वागत केल. सुधीर भाऊंच्या विकास कार्याने मी भारावून गेलो. आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी जनतेची सेवा करण्यासाठी भाजपात प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुल तालुक्यातील काही स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळे गांगरेड्डीवार हे नाराज होते. त्यांना पाहिजे तेवढं महत्त्व देत नसल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर भाजप मध्ये प्रवेश करून जनतेची सेवा करण्याचे त्यांनी ठरवले. मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुदरी यांचेशी संपर्क करून सुधीरभाऊच्या हस्ते प्रवेश घेण्याचे त्यांनी चुदरी यांना सांगितल्या नंतर काल मुहूर्त ठरला. हजारो नागरिकांच्या उपस्थित शरदचंद्र पवार विद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित जाहीर सभेत आपल्या तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. यामुळे या क्षेत्रातील जिल्हा परिषद सर्कल मध्ये भाजपाला बळ तर काँग्रेस ची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे.